Pages

Popular Posts

Wednesday, April 6, 2016

गुढीपाडवा आणि नववर्षानिमित्त सर्वांना शुभेच्छा..! Happy Gudi Padwa

नमस्कार,
गुढीपाडवा आणि नववर्षानिमित्त सर्वांना शुभेच्छा..!

Happy Gudi Padwa



The True Birth Day of Universe
 
 Does the title seem "" Too far-fetched""? Fellow Indian [nay Bharatiya] friends,have we, the descendents of great sages [seientists],ever bothered to find the meaning of the following Sankalp Shloka which we recite before performing any pooja?
           .

This gives us the time as on today (according to earth time frame) from the birht of the present universe!

गुढीपाडवा साजरा करण्याची पद्धत

     Image result for गुढीपाडवा साजरा करण्याची पद्धत  Image result for गुढीपाडवा साजरा करण्याची पद्धत
कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करतच असतो; मात्र तसे करण्यामागची कारणे आपल्याला माहीत असतातच असे नाही. मंगळवार, चैत्र शुद्ध प्रतिपदा, (१६ मार्च २०१०) या दिवशी गुढीपाडवा आहे. गुढीपाडवा साजरा करतांना तो कसा करतात, त्याची आज आपण माहिती घेऊ.

------------------------------------------------
अभ्यंगस्नान (मांगलिक स्नान) 
    गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून प्रथम अभ्यंगस्नान करण्यास सांगितले आहे. शरीराला तेल लावून चोळून ते त्वचेत जिरविणे आणि नंतर ऊनपाण्याने स्नान करणे म्हणजे अभ्यंगस्नान. स्नानामुळे रज-तम गुण एक लक्षांश इतके अल्प होऊन सत्त्वगुण त्याच प्रमाणात वाढतात. त्यांचा प्रभाव नेहमीच्या स्नानामुळे सुमारे तीन घंटे टिकतो, तर अभ्यंगस्नानामुळे चार ते पाच घंटे टिकतो. त्वचेला नेहमी स्निग्धता असावी लागते म्हणून तेल लावायचे. ऊनपाणी हे मंगल आणि शरीराला सुखदायक आहे म्हणून ऊनपाण्याने स्नान सांगितले आहे. अभ्यंगस्नान करतांना देशकाळकथन करावे लागते. 
तोरण लावणे 
    स्नानानंतर आम्रपल्लवांची तोरणे सिद्ध करून प्रत्येक द्वाराशी लाल फुलांसहित बांधावी; कारण लाल रंग शुभदर्शक आहे.

पूजा
    प्रथम नित्यकर्म देवपूजा करतात. `वर्षप्रतिपदेला महाशांती करायची असते. शांतीच्या प्रारंभी ब्रह्मदेवाची पूजा करतात; कारण या दिवशी ब्रह्मदेवाने विश्‍वाची निर्मिती केली. पूजेत त्याला दवणा वहातात. नंतर होमहवन आणि ब्राह्मणसंतर्पण करतात. मग अनंत रूपांनी अवतीर्ण होणार्‍या विष्णूची पूजा करतात. `नमस्ते बहुरूपाय विष्णवे नम: ।' हा मंत्र म्हणून त्याला नमस्कार करतात. नंतर ब्राह्मणाला दक्षिणा देतात. शक्य झाले तर इतिहास, पुराणे इत्यादी ग्रंथ ब्राह्मणाला दान देतात. ही शांती केल्याने सर्व पापांचा नाश होतो, उत्पात घडत नाहीत, आयुष्य वाढते आणि धनधान्याची समृद्धी होते, असे सांगितले आहे.' संवत्सर पूजा केल्याने सर्व पापांचा नाश होतो, आयुष्यवृद्धी होते, सौभाग्याची वाढ होते आणि शांती लाभते. 

गुढी उभारणेया दिवशी विजयाचे प्रतिक म्हणून गुढी उभारली जाते.

पंचांगश्रवण     ज्योतिषाचे पूजन करून त्याच्याकडून किंवा `उपाध्याकडून नूतन वर्षाचे पंचांग अर्थात् वर्षफल श्रवण करतात. 

कडुनिंबाचा प्रसाद
    पंचागश्रवणानंतर कडुनिंबाचा प्रसाद वाटायचा असतो. मंत्राची आवर्तने करीत निंबाची फुले, कोवळी पाने, चण्याची भिजलेली डाळ किंवा भिजलेले चणे, मध, जिरे आणि थोडासा हिंग एकत्र मिसळून हा प्रसाद सिद्ध करावा आणि सर्वांना वाटावा.

  जमीन नांगरणे : या दिवशी जमिनीत नांगर धरावा. नांगरण्याच्या क्रियेने खालची माती वर येते. मातीच्या सूक्ष्म कणांवर प्रजापती लहरींचा संस्कार होऊन बीज अंकुरण्याची जमिनीची क्षमता अनेक पटींनी वाढते. शेतीची अवजारे आणि बैल यांवर प्रजापती लहरी उत्पन्न करणार्‍या मंत्रासह अक्षता टाकाव्या. शेतात काम करणार्‍या माणसांना नवीन कपडे द्यावे. 
  दान : याचकांना अनेक प्रकारची दाने द्यावीत, उदा. पाणपोईद्वारा उदकदान. याने पितर संतुष्ट होतात.
--------------------------------
गुढी उभारण्याची पद्धत 
गुढीचे स्थान :
 गुढी उभी करतांना ती दरवाजाच्या बाहेर; परंतु उंबरठ्यालगत (घरातून पाहिल्यास) उजव्या बाजूला उभी करावी. उजवी बाजू म्हणजे जिवाची कार्यरत स्थिती.
पद्धत : अ. गुढी उभी करतांना सर्वप्रथम सडासंमार्जन करून अंगण रांगोळीने सुशोभित करावे   गुढी उभारण्याच्या जागी रांगोळीने स्वस्तिक काढून त्याच्या मध्यबिंदूवर हळद-कुंकू वहावे.
आ. गुढी उभी करतांना ब्रह्मांडातील शिव-शक्‍तीच्या लहरींना आवाहन करून तिची स्वस्तिकावर स्थापना करावी. यामुळे गुढीच्या टोकावर असलेल्या सर्व घटकांना देवत्व प्राप्‍त होते. 
इ. गुढी आपल्या देहातील सुषुम्नानाडीचे प्रतिनिधित्व करत असल्याने ती जमिनीवर उंबरठ्यालगत; परंतु थोडीशी झुकलेल्या स्थितीत उभी करावी.

महत्त्व 
अ. गुढीची झुकलेली स्थिती 
१. ही जिवाच्या ईश्‍वराप्रती असलेल्या शरणागत भावामुळे कार्यरत झालेल्या सुषुम्ना नाडीचे प्रतीक आहे. 
२. गुढी थोडीशी झुकलेल्या स्थितीत ठेवल्याने तिची रजोगुणी ईश्‍वरी चैतन्याच्या लहरी प्रक्षेपण करण्याची क्षमता वाढल्याने जिवांना वातावरणातील चैतन्याचा फायदा दीर्घकाळ मिळण्यास साहाय्य होते.
आ. तांब्याचा कलश : गुढीवर असलेल्या तांब्याच्या कलशाची ब्रह्मांडातील उच्च तत्त्वाशी संबंधित सात्त्विक लहरी ग्रहण आणि प्रक्षेपण करण्याची क्षमता अधिक असते. 
इ. कडुनिंबाची (कडुलिंबाची) पाने : या पानांच्या रंगकणांच्या माध्यमातून रजोगुणी शिव आणि शक्‍ती लहरींचे वायुमंडलात प्रभावी प्रक्षेपण चालू होते. अशा तर्‍हेने तांब्याच्या कलशातून संक्रमित झालेल्या निर्गुण कार्यरत लहरींचे कडुनिंबाच्या (कडुलिंबाच्या) पानांच्या स्तराला सगुण लहरींमध्ये रूपांतर होते. 
ई. रेशमी वस्त्र : त्यानंतर या लहरी रेशमी वसनाच्या माध्यमातून प्रभावीपणे ग्रहण केल्या जाऊन त्या आवश्यकतेप्रमाणे अधोदिशेकडे प्रक्षेपित केल्या जातात.      
उ. तांब्याचा कलश, कडुनिंबाची पाने आणि रेशमी वस्त्र कडुनिंबाच्या (कडुलिंबाच्या) पानांतून प्रक्षेपित होणार्‍या शिव-शक्‍तीशी संबंधित कार्यरत रजोगुणी लहरींमुळे अष्टदिशांचे वायुमंडल, तसेच तांब्याच्या कलशातून प्रक्षेपित होणार्‍या लहरींमुळे उर्ध्व दिशेचे वायुमंडल आणि रेशमी वसनातून प्रक्षेपित होणार्‍या लहरींमुळे अधोदिशेचे वायुमंडल शुद्ध अन् चैतन्यमय बनण्यास साहाय्य होते. 
आधी वंदूया लंबोदरा, नमुया प्रभाती दिनकरा
सर्वधारीनाम संवत्सरा, शुभारंभ नववर्षजागरा !
जुन्यातले नवे ठेवुन,सर्वांगी नवपालवी लेऊन
नव्याची ओढ सनातन, पुरवो हे वर्ष नूतन !
साडेतीन मुहुर्तांपैकी एक, गुढीपाडवा सण सुरेख
या मंगलदिनी काही एक, शुभकार्य अवश्य करावे..
येत्या वर्षी नवीन घडूद्या , टाकाऊ ते सारे झडूद्या
मंगलवार्ता कानी पडूद्या , गुढी यशाची नवी चढूद्या.
नववर्षी इतिहास घडवा, कर्तॄत्त्वाचे इमले चढवा
माणसांतले मैत्र वाढवा- सुरुवात आजच…गुढीपाडवा !


प्रार्थना : 
`हे ब्रह्मदेवा, हे विष्णु, या गुढीच्या माध्यमातून वातावरणातील प्रजापति, सूर्य आणि सात्त्विक लहरी ग्रहण केल्या जाऊ देत. त्यांतून मिळणार्‍या शक्‍तीतील चैतन्य सातत्याने टिकून राहू दे. मला मिळणार्‍या शक्‍तीचा वापर माझ्याकडून साधनेसाठी केला जाऊ दे, हीच आपल्या चरणी प्रार्थना !  

RAMNATH ,JAYAM,

No comments: